डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत पोलिस गंभीर नाहीत?

डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत पोलिस गंभीर नाहीत?
Published on: 

डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत पोलिस गंभीर नाहीत?
तपास नोंदवहीतील त्रुटींवरून उच्च न्यायालयाचे ताशेरे; महासंचालकांच्या भूमिकेवर नाराजी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : तपास नोंदवही योग्य पद्धतीने न ठेवल्याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर केवळ वेतनरोखीची सौम्य कारवाई करणे कितपत योग्य, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १२) उपस्थित केला. याबाबत पोलिस महासंचालकांची भूमिका काय आहे, याचे समाधानकारक उत्तर सरकारी वकिलांना सुनावणीदरम्यान देता आले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करताना, ठाणे आणि पालघरमधील डॉक्टरांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर प्रकरणांबाबत पोलिस गंभीर नसल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले.

तपास नोंदवही अद्ययावत ठेवली जात नसल्याबद्दल न्यायालयाने मागील सुनावणीवेळी संताप व्यक्त केला होता. पालघरमधील एका खासगी रुग्णालयात झालेल्या धुडगूस प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, या निष्काळजीबद्दल संबंधित तपास अधिकाऱ्यावर केलेल्या सौम्य कारवाईबाबत महासंचालकांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सोमवारी (ता. १२) याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी सरकारी वकिलांनी संबंधित अधिकाऱ्यावर वेतनरोखीची कारवाई केल्याची माहिती दिली; मात्र महासंचालकांकडून अपेक्षित असलेल्या भूमिकेबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. ‘आम्ही केवळ या प्रकरणापुरती महासंचालकांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले नव्हते,’ असे न्यायालयाने सुनावले.
.......
गंभीर प्रकरणात बेजबाबदार दृष्टिकोन; खंडपीठाचा सवाल
गंभीर प्रकरणात इतका बेजबाबदार दृष्टिकोन कसा स्वीकारला जाऊ शकतो, असा सवालही खंडपीठाने केला. महासंचालकांना न्यायालयाच्या प्रश्नाबाबत माहिती देण्यात आली होती का, अशी विचारणा करत संबंधित प्रतिज्ञापत्रात या मुद्द्याचा उल्लेख आहे की नाही, हे सरकारी वकिलांनी स्पष्ट करणे अपेक्षित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. डॉक्टरांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर प्रकरणांबाबत पोलिस गंभीर नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com