

समुद्रात भारताची ताकद वाढणार
‘समर्थक’ नौदलाच्या सेवेत दाखल होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : सागरी सुरक्षेपासून आपत्तीजनक परिस्थितीतील मदतीपर्यंत विविध जबाबदाऱ्या एकाच जहाजातून पार पाडण्याची क्षमता असलेली स्वदेशी ‘समर्थक’ शुक्रवारी (ता. १६) भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. कारवार येथील नौदल तळावर या जहाजाचे कमिशनिंग होईल. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत लार्सन अँड टुब्रो कंपनीने या जहाजाची निर्मिती केली आहे. नौदलासाठी नियोजित चार बहुउद्देशीय जहाजांपैकी ‘समर्थक’ पहिले आहे.
‘समर्थक’ची रचना प्रामुख्याने सागरी देखरेख आणि गस्तीसाठी करण्यात आली आहे. कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा, लक्ष्य तैनात करणे आणि शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांसाठी व्यासपीठ म्हणूनही या जहाजाचा वापर करता येईल. मानवरहित आणि स्वायत्त प्रणालींसाठी मुख्य जहाज म्हणून काम करण्याची क्षमताही आहे. सागरी सुरक्षेच्या पलीकडे जाऊन मदत आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांतही ‘समर्थक’ महत्त्वाची भूमिका बजावू शकते. गरजेनुसार जहाजाचे मर्यादित क्षमतेच्या रुग्णालयीन जहाजात रूपांतर करता येणार आहे. समुद्रातील बचावकार्य आणि बुडालेल्या वस्तू बाहेर काढण्याच्या मोहिमांसाठीही त्याचा वापर करता येईल.
स्वदेशी यंत्रणा, वेगळे बोधचिन्ह
जहाजावर स्वदेशी संवेदक, शस्त्रास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा समावेश आहे. आव्हानात्मक सागरी परिस्थितीत विविध मोहिमा पार पाडण्यासाठी या यंत्रणा उपयुक्त ठरणार आहेत. जहाजाच्या बोधचिन्हात समुद्राच्या लाटांमधून वर येणारा भारतीय हत्ती दाखविण्यात आला आहे. तो सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि चपळतेचे प्रतीक आहे. ‘विजयार्थम् एकनिष्ठता’ हे जहाजाचे ब्रीदवाक्य असून, ‘विजय हेच आमचे एकमेव ध्येय’ असा त्याचा अर्थ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.