

दसऱ्यापासून धावणार माथेरानची राणी
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा २० ऑक्टोबरपासून सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पावसाळ्यामुळे बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन दसऱ्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. मंगळवारपासून (ता. २०) ही सेवा पूर्ववत होईल. त्यामुळे पर्यटकांना नेरळपासूनच माथेरानपर्यंत मिनी ट्रेनने प्रवास करता येईल. दसऱ्याच्या मुहूर्तावर मिनी ट्रेन सुरू होत असल्याने माथेरानमधील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५ जूनपासून नेरळ-अमन लॉजदरम्यानची नियमित सेवा बंद केली होती; मात्र अमन लॉज-माथेरानदरम्यान शटल सेवा सुरू होती. त्यामुळे पर्यटकांना अमन लॉजपासून पुढे मिनी ट्रेनने प्रवास करता येत होता. आता मंगळवारपासून (ता. २०) नेरळ-अमन लॉजदरम्यानची सेवाही सुरू होणार आहे.
हिरव्यागार डोंगरांतून निसर्गसफर
माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. वळणावळणाच्या रेल्वे मार्गावरून धावताना हिरव्यागार डोंगरांचे आणि निसर्गरम्य परिसराचे दर्शन घडते. पावसाळ्यानंतरचा निसर्ग पाहण्यासाठी माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना या प्रवासाची विशेष उत्सुकता असते. पर्यटकांना निसर्गसफरीचा आनंद घेण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. याचा फायदा स्थानिक पर्यटन व्यवसायालाही होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.