

सहाव्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू
गोरेगावमध्ये संशयास्पद घटना
मुंबई, ता. १५ : गोरेगाव पूर्वेतील शिवशाही इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील उघड्या डक्टमधून पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १४) रात्री घडली. या प्रकरणात १० वर्षांच्या मुलीचा सहभाग असल्याचा संशय सीसीटीव्ही फुटेजवरून व्यक्त आहे. सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली असून, सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी (ता. १५) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत १० वर्षांची मुलगी चिमुकलीला उचलून सहाव्या मजल्यावरील उघड्या डक्टमध्ये ढकलताना दिसत आहे. त्यानंतर चिमुकली खाली पडल्याचे फुटेजमध्ये दिसते. काही क्षणांतच संबंधित मुलगी घटनास्थळावरून पळून जाते आणि त्यानंतर त्याच मजल्यावरील मार्गिकेत सायकल चालवताना दिसते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चिमुकलीच्या पालकांनी संबंधित मुलीच्या नातेवाइकांवर गंभीर आरोप केले आहेत. घटनेशी संबंधित पुरावे लपविण्याच्या उद्देशाने त्यांनी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या आरोपांचीही पोलिस पडताळणी करीत आहेत. मृत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, घटनेचा नेमका क्रम, सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्ये आणि पालकांनी केलेले आरोप यांचा सविस्तर तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.