

लोकलमध्ये मोबाईलवर आवाज वाढवल्यास दंड
सहप्रवाशांना त्रास दिल्यास कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलणे, स्पीकरवर गाणी लावणे किंवा व्हिडिओ पाहून सहप्रवाशांना त्रास देणे महागात पडू शकते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे कायद्यात दंडात्मक कारवाईची तरतूद असून, मध्य आणि पश्चिम रेल्वे याची प्रभावी अंमलबजावणी लवकरच करणार असल्याचे समजते.
अशा उपद्रव करणाऱ्या प्रवाशाला एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारता येतो. तसेच सक्षम अधिकाऱ्याने इशारा दिल्यानंतरही उपद्रव सुरू ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये मोबाईलवर स्पीकर लावून गाणी किंवा व्हिडिओ सुरू ठेवल्याने सहप्रवाशांना त्रास होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याची दखल घेत दक्षिण रेल्वेच्या मुख्यालयाने विभागांना परिपत्रक जारी केले आहे. प्रवाशांना नियमांची जाणीव करून देण्यासाठी नियमित उद्घोषणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच धर्तीवर मध्य रेल्वेकडूनही लवकरच स्थानकांवर उद्घोषणा करून जनजागृती करण्यात येणार आहे. जनविश्वास (दुरुस्ती तरतुदी) अधिनियम २०२६ अंतर्गत सुधारित तरतुदींनुसार सक्षम अधिकाऱ्याने इशारा दिल्यानंतरही उपद्रव सुरू ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
...
तिकीट तपासनीसांनाही अधिकार
रेल्वेने तिकीट तपासनीस किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या वाणिज्य कर्मचाऱ्यांना नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. स्थानकांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून नियमित उद्घोषणा करून प्रवाशांना नियमांची माहिती देण्यात येणार आहे. सहप्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.