तीन आरोपींना राजस्थानातून अटक

तीन आरोपींना राजस्थानातून अटक
Published on: 

तीन आरोपींना राजस्थानातून अटक
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी विशेष पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
अंधेरी, ता. १९ (बातमीदार) ः टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन फरार आरोपींना राजस्थानमधून अटक केली आहे. राजस्थान पोलिसांच्या मदतीने विशेष पथकाने आरोपींना कोटा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. तिन्ही आरोपी बिहार आणि हरियानाचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तपासासाठी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने सुमारे २० विशेष पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या पळून जाण्याच्या मार्गाचा शोध घेतला. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून जप्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मोटारसायकलच्या मालकाविषयी माहिती मिळवली आणि आरोपींच्या सुरतपर्यंतच्या प्रवासाविषयी धागेदोरे मिळवले.
पुढील तपासात आरोपी सुरतहून राजस्थानला प्रवास करत असल्याचे उघड झाले. यानंतर मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांना माहिती दिली. कोटा पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळ एका ट्रेनमधून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. नंतर मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com