हिंदुत्वाचा विचार, शिवसैनिकांचा उत्साह

हिंदुत्वाचा विचार, शिवसैनिकांचा उत्साह
Published on: 

हिंदुत्वाचा विचार, शिवसैनिकांचा उत्साह
दसरा मेळाव्यात शिवसेनेची परंपरा, शेतकऱ्यांना मदतीचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या हीरकमहोत्सवी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाचा विचार, शिवसेनेची परंपरा आणि शिवसैनिकांचा उत्साह यांचा संगम पाहायला मिळाला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.
राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार आणि शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून आर्थिक मदत आणि शिवसेनेच्या वतीने दिवाळीचा शिधा थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभदीप’ निवासस्थानावरून दुष्काळग्रस्तांसाठी मदत साहित्य घेऊन जाणारे ट्रक रवाना करण्यात आले. या उपक्रमामुळे राज्याच्या विविध भागांतून दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
....
शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार आणि मराठी माणसाच्या हिताची भूमिका कायम जपली आहे. दसरा मेळाव्यातील उत्साह पाहून शिवसैनिकांमध्ये आजही तीच ऊर्जा असल्याचे जाणवले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांना नवी ताकद मिळत आहे.
- मल्लिका शेख, कार्यकर्त्या
......
दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारसोबत शिवसेनाही उभी राहत आहे, ही समाधानाची बाब आहे. मदत थेट गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
- अनिता लगाडे, कार्यकर्त्या
.....
दसरा मेळावा हा आमच्यासाठी केवळ राजकीय मेळावा नसून, शिवसेनेच्या विचारांची आणि परंपरेची आठवण करून देणारा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा आणि समाजसेवेचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- अनिता शिंदे, कार्यकर्त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com