

ऑनलाइन बदनामीविरोधात राधे माँ उच्च न्यायालयात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : कथित आध्यात्मिक गुरू राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर यांना व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी आणि ऑनलाइन माध्यमांवरील कथित बदनामीकारक मजकुराविरोधात गुगलसह अन्य संबंधितांविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. याचिका आणि प्रस्तावित दाव्याचा मसुदा तपासल्यानंतर न्या. अभय आहुजा यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य केले आणि गुगलसह अन्य प्रतिवादींविरोधात दावा दाखल करण्यास परवानगी दिली.
सुखविंदर कौर यांनी दाखल केलेल्या याचिकेत दिवाणी दावा दाखल करण्यासाठी भारतीय न्यायालयीन प्रक्रियेतील आवश्यक अधिकारक्षेत्राची परवानगी मागितली होती. उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेरही या प्रकरणातील काही बाबी घडत असल्याने, न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी लेटर्स पेटंटच्या कलम १२ अंतर्गत परवानगी घेणे आवश्यक आहे, मात्र याप्रकरणी सुखविंदर कौर आध्यात्मिक आणि धर्मादाय स्वरूपाच्या कार्याचे संचालन मुंबईतच करतात. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येते, असा युक्तिवाद त्यांच्या वतीने ॲड. हसमित त्रिवेदी यांनी न्यायालयात बाजू मांडताना केला. गुगलसह संबंधित डिजिटल माध्यमांवर उपलब्ध कथित आक्षेपार्ह मजकुरामुळे सुखविंदर कौर यांच्या प्रतिष्ठेला, प्रतिमेला, सद्भावनेला आणि व्यक्तिमत्त्व हक्कांना बाधा पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रतिवादी भारताबाहेर असूनही संबंधित मजकूर जगभर प्रसारित होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.