

चैत्यभूमी येथे कार्यकर्त्यांची धरपकड!
साहिल वाकोडेप्रकरणी आंदोलन; विनोदी कलाकारही ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : आयआयटीतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी चैत्यभूमी परिसरात जमलेल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांची मुंबई पोलिसांनी धरपकड केली. या कारवाईदरम्यान स्टँडअप कॉमेडियन मासूम रजवानी यांनाही पोलिसांनी बेकायदा ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना दादर, वरळी, रेसकोर्स इत्यादी ठिकाणी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते चैत्यभूमी परिसरात एकत्र आले होते. या वेळी कँडल मार्चच्या माध्यमातून निषेध नोंदवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; मात्र पोलिसांनी रोखून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान स्टँडअप कॉमेडियन मासूम रजवानी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आलेल्या नागरिकांना पोलिसांनी गुन्हेगार किंवा दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अली भोजानी यांनी केला. पोलिसांनी जनतेच्या हक्कांचे रक्षण करायचे की भ्रष्ट राजकारणी आणि गंभीर गुन्ह्यांतील आरोपींच्या बाजूने उभे राहायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.