सीएसएमटीत टीसीला मारहाण

सीएसएमटीत
टीसीला मारहाण
Published on: 

सीएसएमटीत
टीसीला मारहाण
ओळखपत्र मागताच दाम्पत्याचे गैरवर्तन
मुंबई, ता. २७ : रेल्वे कर्मचारी असल्याचा दावा करत तिकीट तपासणी (टीसी) कर्मचाऱ्याशी वाद घालून त्याला मारहाण केल्याचा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे रविवारी घडला. ओळखपत्र मागितल्याने संबंधित व्यक्तीने टीसीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ऋषिकेश पवार (वय २४) आणि निकिता पवार (२३) या दाम्पत्याविरुद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तिकीट तपासणी कर्मचारी जिग्नेश भावसार हे रविवारी सायंकाळी फलाट क्रमांक पाच आणि सहाजवळ तिकीट तपासणी करत होते. त्या वेळी त्यांनी पवार दाम्पत्याला तपासणीसाठी थांबवले. ऋषिकेशने आपण रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगितले; मात्र भावसार यांनी ओळखपत्राबाबत विचारणा केली असता ते दाखवण्यास नकार दिला. निघून जाण्याचा प्रयत्न करताना रोखल्याने ऋषिकेशने भावसार यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या वेळी ऋषिकेशसोबत असलेल्या निकिता हिनेही टीसीला शिवीगाळ करून गैरवर्तन केल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दोघांना सीएसएमटी येथील रेल्वे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्याकडे ओळखपत्र वा वैध कागदपत्रे नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com