खाद्यतेलाच्या तपासणीत १८.९५ कोटींचा साठा जप्त

खाद्यतेलाच्या तपासणीत १८.९५ कोटींचा साठा जप्त
Published on: 

खाद्यतेलाच्या तपासणीत १८.९५ कोटींचा साठा जप्त
राज्यात ८० परवाने निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : खाद्यतेलातील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर विशेष मोहीम राबविली आहे. १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर या कालावधीत केलेल्या एक हजार ८९ तपासण्यांमध्ये १८.९५ कोटी रुपये किमतीचा सुमारे २८ हजार ७५३ क्विंटल खाद्यतेलसाठा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेत ८० अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले असून, तपासणीसाठी एक हजार ६६० नमुने घेण्यात आले आहेत.
एफडीएने राज्यातील खाद्यतेल उत्पादक, पुनर्लेबलिंग करणारे, घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांची तपासणी केली. प्राप्त प्रयोगशाळा अहवालांनुसार ४६२ नमुने प्रमाणित, ४० अप्रमाणित, १८ असुरक्षित, तर पाच नमुने मिथ्याछाप आढळले आहेत. अद्याप एक हजार १७१ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. पुणे विभागात सर्वाधिक १९ हजार ५५२ क्विंटल तेलसाठा जप्त केला. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच हजार ७३६ क्विंटल साठा जप्त केला. तसेच पुण्यात २२, मुंबईत आठ, तर कोकण, नाशिक आणि नागपूर या विभागांत प्रत्येकी सहा परवाने निलंबित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.