साहिल वाकोडे प्रकरणी वेळकाढूपणा : गायकवाड

साहिल वाकोडे प्रकरणी 
वेळकाढूपणा : गायकवाड
Published on: 

साहिल वाकोडेप्रकरणी
वेळकाढूपणा : गायकवाड
मुंबई, ता. २ : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्याप्रकरणी एफआयआर दाखल होऊनही दीड महिना झाला; मात्र संबंधित प्राध्यापकांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तपासाचे कारण पुढे करून प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. वाकोडेचे पालक आणि गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस शिष्टमंडळाने आज पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. या वेळी खासदार वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, गटनेते अशरफ आझमी, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, सुभाष भालेराव, जयवंत लोखंडे आदी उपस्थित होते.
पोलिस महासंचालकांच्या भेटीनंतर गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाकोडे प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही संबंधित प्राध्यापकांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. एकीकडे चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करून साहिलची बदनामी केली जात आहे. साहिलच्या मृत्यूला जबाबदार प्राध्यापक अद्याप मोकाट असून, केवळ तपास सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. आयआयटी मुंबईत गेल्या काही वर्षांत १३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा घटना वारंवार घडणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे गायकवाड म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.