

दिया मिर्झाचा व्हिडिओ हटवण्यावरून वाद
भाजपच्या टीकेनंतर महापालिकेची माघार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ भाजपच्या दबावात मुंबई महापालिका प्रशासनाने हटवला. त्यामुळे महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय दबावापुढे प्रशासनाने माघार घेतली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ हटवण्याचा निर्णय घेताना त्यामागील कारण स्पष्ट करण्याची तसदीही संबंधित विभागाने घेतलेली नाही.
दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ महापालिकेच्या अधिकृत समाज माध्यम खात्यावर प्रसिद्ध करण्यात आला होता. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडू नयेत, ध्वनिप्रदूषण टाळावे, असे आवाहन या व्हिडिओतून करण्यात आले होते. मात्र, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेत महापालिकेच्या भूमिकेवर टीका केली. दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी महापालिकेलाही टॅग केले होते. त्यानंतर काही वेळातच महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने हा व्हिडिओ अधिकृत खात्यावरून हटवला. या संपूर्ण प्रकरणात महापालिकेच्या जनसंपर्क विभागाची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. प्रदूषण नियंत्रण आणि न्यायालयाच्या निर्देशांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा मोहिमेचा उद्देश होता. मग एका राजकीय नेत्याने आक्षेप घेतल्यानंतर व्हिडिओ हटवण्याची गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
...
मोहिमेवरच प्रश्नचिन्ह
दिया मिर्झासह क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांचाही या मोहिमेत सहभाग घेण्याचे महापालिकेचे नियोजन होते, असे समजते. व्हिडिओसंंबंधी वादामुळे आता महापालिकेच्या संपूर्ण जनजागृती मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.