सोसायटीच्या तीन पदाधिकाऱ्यांवर मुलाचा मृत्यूप्रकरणी गुन्हा

सोसायटीच्या तीन पदाधिकाऱ्यांवर मुलाचा मृत्यूप्रकरणी गुन्हा
Published on: 

सोसायटीच्या तीन पदाधिकाऱ्यांवर मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा
लिफ्ट देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : कुर्ला पूर्व येथील एका निवासी इमारतीतील लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी सोसायटीच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लिफ्टची योग्य देखभाल आणि दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका अभियंत्याने तपासणीदरम्यान संबंधित लिफ्ट वापरण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. घटनेनंतर जवळपास चार महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली.
तौफिक अशफाक खान (वय ५२), आसिफ मन्सूर खान (५०) आणि मोला हुसेन पटेल (६०) अशी गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. ते कुर्ला येथील जागृतीनगरमधील शमीम टॉवर कुर्ला कदम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार आहेत. शनिवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), १२५, २८९ आणि ३ (५) अन्वये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित दुर्घटना ६ जुलै २०२६ला रात्री साडेनऊच्या सुमारास शमीम टॉवरच्या इमारत क्रमांक दोनमधील बी विंगमध्ये घडली होती. झैन तहसीलदार हा ११ वर्षीय मुलगा दहाव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये इतर मुलांसोबत खेळत होता. त्या वेळी लिफ्टचे दार अचानक उघडल्याने त्याचा तोल गेला आणि तो लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडला. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या लिफ्टच्या केबिनच्या छतावर तो कोसळला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी मृत मुलाचे वडील जामिर शौकत तहसीलदार (३२) यांची सविस्तर तक्रार नोंदवली. त्यानुसार सोसायटीच्या तीन पदाधिकाऱ्यांवर निष्काळजीचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.