‘जलसा’, उच्च न्यायालयाला पुन्हा बाॅम्बची धमकी

‘जलसा’, उच्च न्यायालयाला 
पुन्हा बाॅम्बची धमकी
Published on: 

‘जलसा’, उच्च न्यायालयाला
पुन्हा बाॅम्बची धमकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई उच्च न्यायालय, मुंबई शेअर बाजार (बीएसई), महालक्ष्मी रेसकोर्स आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील ‘जलसा’ निवासस्थान बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल शुक्रवारी मिळाल्याने खळबळ उडाली. या धमकीनंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी हाय अलर्ट जारी करून संबंधित ठिकाणी बॉम्बशोधक पथकासह तपासणी केली. यात मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्यामुळे ही अफवा ठरली. सायबर पाेलिसांनी ई-मेलच्या स्राेताचा तपास सुरू केला.
२३ ऑक्टोबरलाही मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांना धमकीचा ई-मेल मिळाला होता. त्यात शाळेवर ग्रेनेड हल्ला, बच्चन यांच्या निवासस्थानावर ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान हल्ला तसेच २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्सवर होणाऱ्या गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नुकतेच अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’बाहेर बुलेटप्रूफ काचेच्या आडून चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले हाेते.

दुसरीकडे, अभिनेता टायगर श्रॉफवर जीवघेणा हल्ला झाल्यापासून बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना वेगवेगळ्या माध्यमांतून धमक्या मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर यांनाही धमकी मिळाली होती. आयुष्मान खुरानाला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचने बंगळूरमधून एका आरोपीला अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.