बच्चन पितापुत्रास जीवे मारण्याची धमकी

बच्चन पितापुत्रास जीवे मारण्याची धमकी
Published on: 

बच्चन पितापुत्रास जीवे मारण्याची धमकी

मुंबई, ता. १६ : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लन याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. १९८४च्या शीखविरोधी दंगलींसंदर्भात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून ही धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जवळीक असलेल्या गोल्डी ढिल्लन याने सोमवारी समाजमाध्यमावर पोस्ट करत बच्चन पितापुत्राला लक्ष्य करण्याचा इशारा दिला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत नुकतीच विकास ठाकूर आणि दीपक सिंग या दोघांना अटक केली होती. हे दोघेही आपल्या टोळीचे सदस्य असल्याचा दावा ढिल्लन याने पोस्टमध्ये केला आहे. त्यांच्या अटकेमुळे टोळीच्या कारवायांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगतानाच मुंबईत आपले आणखी २०० हस्तक सक्रिय असल्याचा दावा त्याने केला.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना लक्ष्य करताना, त्यांनी कितीही बुलेटप्रूफ केबिन किंवा सुरक्षेची व्यवस्था केली, तरी त्यातून त्यांचे संरक्षण होणार नाही, अशी धमकी ढिल्लन याने दिली. या धमकीमुळे बच्चन कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या धमकीतील दाव्यांची पोलिसांकडून अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना गुन्हेगारी टोळ्यांकडून उघडपणे हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशा धमक्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी थेट आव्हान आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मूलभूत जबाबदारी पार पाडण्यात दोघेही अपयशी ठरले आहेत, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच, दोघांनी राजीनामा देऊन घरी जावे, अशी मागणीही त्यांनी आपल्या पोस्टद्वारे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.