कोमसापतर्फे विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोमसापतर्फे विविध कार्यक्रम
कोमसापतर्फे विविध कार्यक्रम

कोमसापतर्फे विविध कार्यक्रम

sakal_logo
By

मुरूड, ता. १९ (बातमीदार) : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मुरूडतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गजानन (भाऊ) बागडे स्मृती समारोहनिमित्त साहित्यिक मैफिलचे गुरुवारी रंगली. तर वक्तृत्व कला आत्मसात करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी (ता. २१) सकाळी ९.३० वाजता वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, मुरूड येथे होणार आहे. जागर माय मराठी कार्यक्रमांतर्गत ग्रंथप्रदर्शन, काव्यवाचन व अभिवाचन सोमवारी (ता. २३) सार्वजनिक वाचनालयात सायंकाळी ४ वाजता होणार आहे. तर महाविद्यालयीन तालुकास्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. २४) सकाळी ९.३० वाजता, तर महाविद्यालयीन तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे, अशी माहिती शाखाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी दिली. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.