पालकांसह आजी-आजोबांच्या स्‍मृतींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांसह आजी-आजोबांच्या स्‍मृतींना उजाळा
पालकांसह आजी-आजोबांच्या स्‍मृतींना उजाळा

पालकांसह आजी-आजोबांच्या स्‍मृतींना उजाळा

sakal_logo
By

मुरूड, ता. २२ (बातमीदार) ः कोविडमुळे खंडित झालेली ‘सकाळ’ चित्र कला स्पर्धा या वर्षी आबालवृद्धांच्या कला गुणांना प्रोत्साहित करणारी ठरली. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा स्वरूपात प्रथमच पालकांसह आजी आजोबांच्या शालेय जीवनाच्या स्मृती जागवणारी ही स्‍पर्धा होती. मुरूड तालुक्यातील छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय, यशवंतनगर, नांदगाव केंद्रांत गट शिक्षणाधिकारी बी.के. पारखे, मुख्याध्यापक उत्तमराव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्‍पर्धा पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून उपतालुका प्रमुख (शिंदे गट) विघ्नेश विलास सुर्वे उपस्थित होते.
तालुक्‍यातील ऑफलाईन चित्रकला स्‍पर्धा चार गटांत पार पडली. तालुक्यातील छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयासह सर एस. ए. हायस्कूल, अंजुमन इस्लाम हायस्कूल, नांदगाव पंचक्रोशी हायस्कूल, नज अॅकेडमी, नचिकेताज हायस्कूल, वाणदे हायस्कूल, मुरूड नगरपरिषद मराठी शाळा, ओंकार विद्या मंदिर आदी विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी कुंचल्यातून नाना छटा साकारत स्‍पर्धेत उस्फूर्त सहभाग घेतला. सर्वच वयोगटासाठी स्‍पर्धा असल्‍याने पालकांसह शिक्षण, आजी-आजोबांनीही उस्‍फूर्त सहभाग नोंदवला. चित्रकला शिक्षक दरणे, लियाकत धनसे, महेंद्र पाटील, दीपक गोसावी, शांताराम वाघमारे आदींनी स्पर्धा यशस्‍वी करण्यासाठी परिश्रम घेतले.