Tue, March 21, 2023

कुडगावातील आरोग्य तपासणी शिबिर
कुडगावातील आरोग्य तपासणी शिबिर
Published on : 14 February 2023, 11:58 am
मुरूड, ता. १२ (बातमीदार) ः अदाणी फाउंडेशन दिघी पोर्टतर्फे कुडगाव ग्रामपंचायतीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. आर.एन. कुपर रुग्णालय, विलेपार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी मधुमेह, त्वचा रोग, कान नाक आणि घसा या विषयावर शल्य चिकित्सकांनी १६६ जणांची तपासणी केली. तसेच प्रतिबंधात्मक उपचार केले. दैनंदिन आहाराबाबत या वेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. समुद्र किनारा आणि खाऱ्या हवेमुळे त्वचेच्या आजाराने अनेक लोक त्रस्त असल्याचे यावेळी निदर्शनास आले, त्यांनीही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासाठी माणगाव येथील औषध विभाग नितीन चांदोरकर, अदाणी फाउंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे, जगन्नाथ खार्गावकर आदींचे सहकार्य लाभले.