नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे आव्हानात्मक काम - खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे आव्हानात्मक काम - खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे आव्हानात्मक काम - खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे आव्हानात्मक काम - खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

sakal_logo
By

नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे आव्हानात्मक
खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
मुरूड, ता. १३ (बातमीदार) : इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून सातत्याने गुणवत्ता राखत चालवणे हे खरोखर धाडसाचे काम आहे. मुलांची शारीरिक व बौद्धिक जडणघडणी करताना भविष्याचा वेध घेऊन नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे हे आव्हानात्मक काम आहे, असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले.
मुरूड येथील नचिकेताज इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तुचे उद्‍घाटन करताना उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तटकरे पुढे म्हणाले, मुरूडसारख्या प्रमुख पर्यटनस्थळी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मंगेश दांडेकर व मुग्धा दांडेकर या दाम्पत्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. संकटावर मात करत अनेकांचे सहकार्य घेऊन ते हे कार्य नेटाने पुढे नेत असल्याबद्दल गौरवोद्‍गार काढले. पर्यटनाशी निगडीत उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्धतेसाठी राज्य व केंद्र सरकारतर्फे जे सहकार्य लागेल ते देण्याची ग्वाही तटकरे यांनी दिली. या वेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, नजिकेताजचे ट्रस्टी मंगेश दांडेकर, मुग्धा दांडेकर, सुबोध महाडिक, सुभाष महाडिक, स्मिता खेडेकर, अविनाश दांडेकर, तेलवडे सरपंच कल्पना वाघमारे, प्राचार्य डॉ. नगर बा. वडी, डॉ. विश्वास चव्हाण, प्रमोद देशमुख, नितीन पवार, प्राचार्य योगेश तंटक, अजित गुरव उपस्थित होते.
नचिकेताज विद्यालयातर्फे आजपर्यंत गुणवत्ताधारक विद्यार्थी आय. टी. इंजिनीअरिंग, आर्किटेक्ट क्षेत्रात कार्यरत आहे. आगामी काळात ज्युनि/सीनियर कॉलेज व डिप्लोमा कोर्सेस सुरू करण्याचा संकल्प केल्याचे मंगेश दांडेकर यांनी सांगितले. खासदार तटकरे यांनी सहकार्य व मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. माजी विद्यार्थिनी श्रृती पवार हिने मनोगतातून शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार यांनी, तर आभार योगेश तंटक यांनी मानले.

दोन वर्षांपूर्वी निसर्ग चक्रीवादळात दोनदा शाळेचे प्रचंड नुकसान झाले. कोणतीही संस्था चालवताना पैशांचे सोंग आणता येत नाही. नवीन शाळेची उभारणी करताना रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ट्रस्टमार्फत आर्थिक सहकार्य केले. तसेच महात्मा फुले पतसंस्थेने वित्त पुरवठा केला.
- मंगेश दांडेकर, नजिकेताज ट्रस्टी