Thur, March 30, 2023

किशोर माळी यांची राज्यस्तरीय कबड्डी पंच म्हणून निवड
किशोर माळी यांची राज्यस्तरीय कबड्डी पंच म्हणून निवड
Published on : 21 February 2023, 12:48 pm
मुरूड (बातमीदार) : तालुक्यातील लक्ष्मीखार गावचा कबड्डीपटू किशोर सुंदर माळी यांची राज्यस्तरीय कबड्डी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे तालुक्यातील कबड्डीचे खेळाडू व शौकिनांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माळी यांनी अनेक स्थानिक व जिल्हा पातळीवरील कबड्डी सामन्यात निःपक्षपाती पंचगिरी करून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यांनी तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल कबड्डी असोशिएशन मुरूड व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे