
महाविद्यालयातर्फे मोफत नेत्र तपासणी
मुरूड (बातमीदार) : अंजुमन हायस्कुल पंचक्रोशी यशवंतनगर येथे अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरूड-जंजिरा व आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर बुधवारी (ता. २२) घेण्यात आले. या शिबिरात नेत्रचिकित्सा करण्यासाठी प्रकाश पाटील, क्रिजन पशजुली, अश्विनी पाटील, अवंतिका रिकामे, नेत्रा होडपे, कल्पेश सावंत, अमर पोकळे व सपना शर्मा शंकर आय हॉस्पिटलमार्फत तपासणीसाठी उपस्थित होते. शिबिरादरम्यान २५० जणांची मोफत नेत्रतपासणी करून जवळजवळ ५० जणांना अल्प दरात चष्मेही उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे, या शिबिरात २५ गरजू मोतीबिंदूग्रस्तांचे मोफत शस्त्रक्रियेसाठी शंकर आय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे अध्यक्ष जैनुद्दीन कादिरी व प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या पुढाकाराने करण्यात आले.