चौकाचौकात गुंजले राज्‍यगीताचे स्‍वर

चौकाचौकात गुंजले राज्‍यगीताचे स्‍वर

मुरूड, ता. १ (बातमीदार)ः महाराष्ट्र दिनी तहसीलदार रोहन शिंदे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्‍ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्‍ट्र माझा’ हे राज्यगीत गाण्यात आले.
पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ, नायब तहसीलदार रवींद्र सानप, गोविंद कौटुंबे , गट शिक्षण अधिकारी बाबुलाल पारखे, माजी नगरसेवक प्रमोद भायदे, माजी तहसीलदार नयन कर्णिक, ज्येष्ठ नागरिक, पोलिस पथक, होमगार्ड पथक, तहसील कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली.
मुरुड जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणातील राजे शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्यास मुख्याधिकारी पंकज भुसे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा-स्नेहा पाटील, माजी उपनगराध्यक्षा- नौसिन दरोगे, विश्वास चव्हाण, अविनाश दांडेकर, युगा ठाकूर, पांडुरंग आरेकर, अनुजा दांडेकर, परेश कुंभार, राकेश पाटील आदींसह कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.
शासकीय-निमशासकीय आस्थापनांमध्येही सकाळी राष्‍ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

मुरूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com