अपूर्ण कामामुळे बोर्ली रस्‍त्‍यावर पाणी

अपूर्ण कामामुळे बोर्ली रस्‍त्‍यावर पाणी

Published on

मुरूड, ता. ९ (बातमीदार) ः बोर्ली-मांडला रस्त्यावरील मोरीचे काम मे महिन्यात मंजूर करण्यात आले. मात्र ते पूर्ण न झाल्‍याने पावसाचे पाणी रस्‍त्‍यावर साचून राहत आहे तसेच लगतच्या दुकानांमध्ये शिरल्‍याने मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. दुकानातील मालाची नुकसान झाल्‍यास दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने भरपाई द्यावी, अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरूड तालुका सचिव राजेश गजानन तरे यांनी केली आहे. गतवर्षी मुरूड तालुक्‍यात ३००मिमीहून अधिक पाऊस कोसळला होता. त्या वेळी बोर्ली नाका व आजूबाजूच्या परिसरात दुकानामध्ये पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले होते. रस्‍त्‍याचे तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरीच्या कामासाठी लाखोंचा निधीही मंजूर करण्यात आला होता, मात्र बांधकाम विभागाने काम पूर्ण न केल्‍याने यंदा पुन्हा मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती दुकानदारांना आहे. बांधकाम विभागाने पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व जलद व्यवस्था करावी अन्यथा दुकानदारांचे नुकसान झाल्यास आर्थिक भरपाई द्यावी, असा इशारा मनसेचे मुरूड तालुका सचिव राजेश तरे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.