मुरूड शहरात २२ इमारती धोकादायक

मुरूड शहरात २२ इमारती धोकादायक

मुरूड शहरात २२ इमारती धोकादायक

मुरूड, ता. ४ (बातमीदार) ः पावसाळा तोंडावर असताना मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या वतीने जीर्ण, मोडकळीस आलेल्‍या इमारतीचे सर्वेक्षण केले असता, २२ इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. नगरपरिषदेच्या वतीने नोटीस बजावून रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संभाव्य अतिवृष्टी, पूर, वादळ तसेच जमीन खचणे, भुस्खलन, दरड कोसळणे, धोकादायक झाडे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी त व जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ज्या मिळकती इमारती - धोकादायक झाल्या आहेत तसेच डोंगर उतारावर, खाडीलगत आहेत, अशा इमारती अथवा मिळकतीमध्ये कोणीही वास्तव्य करू नये, असे आवाहन मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com