खंडित विजेमुळे काजू उत्‍पादकांचे नुकसान

खंडित विजेमुळे काजू उत्‍पादकांचे नुकसान

Published on

मुरूड, ता. २ (बातमीदार) ः वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने मुरूड शहरासह तालुक्‍यातील नागरिक त्रस्‍त आहेत. पावसामुळे दुग्‍धजन्य पदार्थ, काजूगर प्रक्रियेत व्यत्‍यय येत असल्‍याने उत्‍पादकांचे मोठे नुकसान होत आहे. आठवड्यात दर मंगळवारी भारनियमन करण्यात येते, असे असले तरी काही दिवसांपासून वेळी-अवेळी बत्ती गुल होत असल्याने बँकेची, टपाल कार्यालयातील, सरकारी दाखले वाटपाच्या कामात व्यत्‍यय येत आहे.
वीज महावितरणकडून मजगाव नांदगाव परिसरात दिवसातून पाच ते सहा वेळा चार ते पाच तासांसाठी वीज गायब होते. त्‍यामुळे काजूगर प्रक्रिया व्यवसायात दिवसाला दोन ते तीन हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे. महावितरणचे अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास, पाबरे उपकेंद्रातूनच पुरवठा खंडित झाल्‍याचे सांगण्यात येते. पावसाळा सुरू झाला असला तरी वातावरणातील उष्‍मा कमी झालेला नाही. त्‍यामुळे वीजपुरवठा खंडित होताच नांदगाव मंडळातील २६ गावे असून, सुमारे २५ हजार लोकवस्‍तीला त्रास सहन करावा लागतो.
मजगाव येथील प्रीतम पाटील यांच्या काजूगर उत्पादनावर विजेअभावी प्रक्रियेत व्यत्यय येत असून, उत्पादन हाती मिळत नसतानाही कामगारांना पगार द्यावा लागतो. परिणामी हजारो रुपयांचे नुकसान होत असल्‍याचे पाटील यांनी सांगितले. वीजवाहिनी बदलण्याकरिता नांदगाव येथील रोहित्र बंद न करता, मजगाव, नांदगाव या संपूर्ण वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे.
वीजपुरवठ्यामध्ये सुधारणा न केल्‍यास ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा निर्णय परिसरातील व्यावसायिकांनी घेतला आहे. वीज समस्‍येबाबत नांदगाव अभियंत्‍यांची संपर्क साधला असता, सध्या पावसाचे दिवस असल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने फांद्या मुख्य वाहिनीवर पडतात. त्‍यामुळे पुरवठा खंडित होतो. दुरुस्‍ती कामात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्‍हणून मुख्य वाहिनी बंद करावी लागत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com