म्हसळा तालुक्यातील चिखलप केंद्राचा शैक्षणिक अभ्यास दौरा

म्हसळा तालुक्यातील चिखलप केंद्राचा शैक्षणिक अभ्यास दौरा

म्हसळा तालुक्यातील चिखलप केंद्राचा शैक्षणिक अभ्यास दौरा
म्‍हसळा, ता. २९ (बातमीदार) : म्हसळा तालुक्यातील चिखलप केंद्रातील सर्व शाळांमधील शिक्षकांनी केंद्रप्रमुख किशोर मोहिते यांच्‍या अध्यक्षतेखाली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील तालुक्यात प्रथम क्रमांक आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्‍या गायरोणे शाळेला भेट दिली. म्हसळा शालेय पोषण आहारअंतर्गत परसबाग स्पर्धेत संबंधित शाळेने चालू वर्षी प्रथम क्रमांक व जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी स्वागतगीत गायले. यानंतर मुख्याध्यापक सुनील साठे व स्मिता शिंदे यांनी परसबागमधील विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे यांची माहिती दिली.
यावेळी शालेय इमारत सुशोभीकरण तसेच विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेले विविध उपक्रमांची माहिती शिक्षकांना देण्यात आली. यामध्ये शाळा आणि वर्ग सजावट, शालेय रंगरंगोटी, वृक्षारोपण आणि जोपासना, तंबाखूमुक्त शाळा, मेरी माटी मेरा देश, विद्यार्थी बचत बँक, प्लास्टिकमुक्त अभियान आदी उपक्रमांची माहिती देण्यात आली. तालुक्यातील दुर्गम भागातील शाळा असूनही शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले असल्‍याने सर्वानी कौतुक केले. यावेळी केंद्रप्रमुख किशोर मोहिते यांनी सांगितले की, या शाळेची इमारत माजी मुख्याध्यापक तानाजी तरंगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्‍थितीमध्ये उत्तमप्रकारे बांधून घेतली आहे. त्‍यानंतर आलेल्या साठे दांपत्याने शाळा नावारूपाला आणून शाळेची प्रगती केली. विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके पटकावली आहेत. त्‍याबद्दल शाळा व्‍यवस्‍थापनाने चांगले काम केले असल्‍याचे मोहिते यांनी सांगितले. तर शाळेने उत्तम काम केले असून तिला आयएसओ मानांकन देण्यात यावे, अशी सूचना गटविकास अधिकारी जाधव यांनी केली. तर मुख्याध्यापक सुनील साठे यांनी शाळेला भेट देऊन मनोबल वाढविल्‍याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com