म्हसळ्याच्या विकासाची गती कायम राहणार : मंत्री आदिती तटकरे
म्हसळ्याच्या विकासाची गती कायम राहणार : मंत्री आदिती तटकरे
म्हसळा, ता. ४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील गाववाडी व वस्त्यांमध्ये जनतेला अपेक्षित असणारी विकासकामे करण्यात आली असून, उर्वरित कामेही पूर्ण केली जातील आणि यापुढेही विकासाची गती अखंड सुरू राहील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. त्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय आयोजित गावभेटी, संवाद तसेच मंजूर विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होत्या.
या दौऱ्यादरम्यान मंत्री तटकरे यांनी मेंदडी कोंड, मेंदडी गाव, खरसई, गणेशनगर, बनोटी, रेवली, आगरवाडा, वरवठणे, पेडांबे, वरवठणे कोंड, साळविंडे बागाचीवाडी, साळविंडे देवळाची वाडी, साळविंडे ताडाची वाडी, तोंडसूरे जंगमवाडी, तोंडसूरे मूळगाव, खारगाव खुर्द आदी गावांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, मागण्या आणि सूचना जाणून घेतल्या. याचबरोबर विविध मंजूर विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनही करण्यात आले. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ग्रामस्थांनी आतापर्यंत दिलेली साथ यापुढेही कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्री तटकरे यांनी गावांच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले. रस्ते, साकव, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि मूलभूत सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या दिवसभर चाललेल्या गावभेटी, बैठक, संवाद आणि विकासकामांच्या कार्यक्रमाला नायब तहसीलदार शेखर खोत, गटविकास अधिकारी माधव जाधव, उपपोलिस निरीक्षक सुनील रोहिणकर, बांधकाम अभियंता एस. आर. भगत, पाणीपुरवठा अभियंता अनिता दवटे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती महादेव पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश खडस यांच्यासह अनेक पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

