म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळाचा गजर

म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळाचा गजर

Published on

म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर
जिल्हा परिषद दोन, तर पंचायत समितीच्या चारही जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
म्हसळा, ता. ९ (बातमीदार) ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत घड्याळाचा दणदणीत गजर केला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.
पाभरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल बसवत यांनी एकूण पाच हजार ९९३ मते मिळवत शेकापचे संतोष पाटील (२,८८४ मते) व शिंदे गटाचे अकमल कादरी (२,६४८ मते) यांचा पराभव केला. बसवत यांनी तब्बल तीन हजार १०९ मताधिक्याने विजय मिळवला. पांगलोळी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक विचारे यांनी सहा हजार ३२२ मते घेत शिंदे गटाचे प्रसाद बोर्ले (२,५६७ मते) व ठाकरे गटाचे रोशन पारावे (१,४४८ मते) यांना मागे टाकत ३,७५५ मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला.
पंचायत समिती निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. पाभरे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या समृद्धी संदीप चाचले यांनी ३,०७८ मते मिळवत शेकापच्या ज्योती गीजे (१,४४३) व शिंदे गटाच्या अमिता जाधव (१,२५८) यांचा पराभव केला. खरसई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू अंबाजी म्हात्रे यांनी २,७७८ मते घेत शिंदे गटाचे महेश पाटील (१,६६८) व ठाकरे गटाचे रमेश खोत (१,२२०) यांचा पराभव करत १,११० मताधिक्याने विजय मिळवला.
साळविंडे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन श्रीपत मनवे यांनी ३,४१३ मते मिळवत शिंदे गटाचे अमोल पेंढारी (१,५९२) व ठाकरे गटाचे बाळकृष्ण म्हात्रे (७०७) यांचा पराभव केला. पांगलोळी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका प्रसन्न निंबरे यांनी ३,१३१ मते मिळवत शिंदे गटाच्या रिया पाटेकर (९४९) व ठाकरे गटाचे चैतन्या गजमल (७३१) यांचा पराभव करत २,१८२ मताधिक्याने विजय मिळवला.
या निकालांमुळे म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. विजय मिळाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.


फोटो -
म्हसळा ः निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवरांनी जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com