

नरेंद्र मेहतांच्या कंपनीला
बेकायदा बांधकाम परवानगी?
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप
भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : न्यायालयाचे आदेश असतानाही भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचा सहभाग असलेल्या बांधकाम प्रकल्पाला पालिकेकडून बेकायदा परवानगी देण्यात आल्याचा आरोप परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज आहे. एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात झाली असल्याचाही गौप्यस्फोट सरनाईक यांनी केला.
मिरा रोड येथील दोन जमीन मालकांनी आपल्याकडे यासंदर्भात तक्रार केली असल्याचे सरनाईक यांनी या वेळी सांगितले. परवानगी देण्याबाबत कारवाई करू नये, असे न्यायालयाने सांगितले असतानाही नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी देण्यात आली. यात न्यायालयाचा अवमान झाला असून, यासंदर्भात मी पालिकेला पत्रसुद्धा दिले होते. त्यानंतरही पालिकेने प्रकल्पाला बेकायदा बांधकाम परवानगी दिली. या प्रकरणात सेवन इलेव्हन कंपनीसह अनेक बड्या व्यक्ती भागीदार असून, एका सावंत नावाच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने तब्बल २० कोटी रुपये या प्रकरणात गुंतवले असल्याचेही सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
सरनाईक यांनी सोमवारी (ता. ७) नगररचना विभागाला भेट देऊन यासंदर्भातील कागदपत्रांची पाहणी केली. याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तसेच मुख्य सचिवांकडे तक्रार करत चौकशीची मागणीदेखील केली. त्यासाठी कागदपत्रे सील करून ताब्यात घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. संबंधित वास्तुविशारदाचा परवाना रद्द करण्यात यावा व विकसकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली असल्याची माहितीही सरनाईक यांनी या वेळी दिली.
प्रताप सरनाईक यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. आमची कंपनी सर्व कामे नियमानुसारच करते.
- नरेंद्र मेहता, आमदार
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.