मिरा-भाईंदरमध्ये बसभाडे दरवाढ लागू

मिरा-भाईंदरमध्ये बसभाडे दरवाढ लागू
Published on: 

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी बस दरवाढ लागू करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपने आज (ता. १६) झालेल्या महासभेत बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा पडला आहे. या दरवाढीला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला.

सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात किमान दोन रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे दिला होता. गेल्या १३ वर्षांत तिकीट भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही, मात्र डिझेल व सुट्ट्या भागाच्या दरात झालेली वाढ तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ लक्षात घेता दरवाढ आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. परिवहन सेवेतील बसची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्यात वारंवार बंद पडत आहेत. अशा परिस्थितीत डबघाईला आलेल्या परिवहन सेवेची गुणवत्ता वाढवणे, सेवा सुरळीत करणे आवश्यक असताना तिकीट दरात वाढ करून सर्वसामान्य प्रवाशांवर दरवाढीचा बोजा टाकणे चुकीचे आहे, अशी भूमिका विरोधी पक्षातील शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी, काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर, नगरसेवक शॉन कोलासो यांनी घेतली.

दिव्यांग, विद्यार्थ्यांना सवलत
प्रशासनाने तिकीट दरवाढ करू नये, असा ठराव विरोधी पक्षांनी मांडला. मात्र सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. ठराव मंजूर करताना दिव्यांग व विद्यार्थ्यांना तिकीट दरात शंभर टक्के व वरिष्ठ नागरिकांना पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याचे स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com