मारहाण प्रकरणात भाजपच्या १६ नगरसेवकांवर गुन्हा दाखल

मारहाण प्रकरणात भाजपच्या १६ नगरसेवकांवर गुन्हा दाखल
Published on: 

भाजपच्या १६ नगरसेवकांवर गुन्हा
महासभेत नागरिकांसह पत्रकारांनाही मारहाण
भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेदरम्यान नागरिक आणि पत्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात भाईंदर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी (ता. १६) घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महासभा सुरू असताना प्रेक्षकगृहातील काही नागरिक मोबाईलवर चित्रीकरण करीत असल्याचा संशय महापौर डिंपल मेहता यांना आला. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी संबंधित नागरिकांना चप्पल आणि ठोशांनी मारहाण केल्याचा तसेच अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या वेळी काही पत्रकारांनाही मारहाण करून धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाण झालेल्या करण पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून शानू गोहील, तरुण शर्मा, रुपाली मोदी, प्रीती जैन, वंदना भावसार, हेतल परमार, विशाल पाटील, संजय थरथरे, नवीन सिंग, कविता त्रिपाठी, दीपिका अरोरा, महेश म्हात्रे, भरत कोठारी, हेमा बेलानी, योगिता शर्मा आणि मनीष पराशर या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवकांच्या कथित आर्थिक घोटाळ्यांबाबत आणि कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, पत्रकारांनाही मारहाण झाल्याने संबंधित नगरसेवकांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. यासंदर्भात शनिवारी (ता. १७) सायंकाळी पत्रकारांनी पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com