माथेरान मध्ये जंगली फळांचा हंगाम झाला सुरू... बाजारात ... फळांची आवक

माथेरान मध्ये जंगली फळांचा हंगाम झाला सुरू... बाजारात ... फळांची आवक

माथेरानमध्ये जंगली फळांचा हंगाम झाला सुरू...
बाजारात ... फळांची आवक


अजय कदम, माथेरान

माथेरानमधील वनपट्टा सध्या विविधरंगी फळा-फुलांनी बहरला आहे. मोठा असल्‌टा्‍याने या पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात असलेल्या जंगलात चैत्र महिना सुरू झाला की जंगलातील जंगली झाडांना फुले आणि फळे येण्याचा हंगाम सुरू होतो.जंगलातील फळे ही माथेरानकरांसाठी औषधी ठेवा असतो.त्यामुळे माथेरान मधील तरुण आणि स्थानिक आदिवासी हे या फळांचा आस्वाद घेण्यासाठी जंगलात फिरताना दिसत आहेत.
अवकाळी पावसामुळे माथेरानच्या निसर्गाला आला बहर आल्याचे दिसून येत आहे.समुद्रसपाटीपासून 803.66 मीटर उंचीवर असणारे सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीतील निसर्गाचे देणे लाभलेले निसर्गरम्य माथेरान आणखी खुलून गेले आहे.माथेरानला येणारा पर्यटक निसर्ग आपल्या नजरेत साठवून घेऊन जात असतात. माथेरानच्या डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगल हे माथेरानचे आकर्षण असून प्रदूषण मुक्त वातावरण सध्या येथे उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे.मात्र चैत्र महिन्याची सुरुवात झाली आणि अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.त्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने माथेरान मधील झाडांवर बसलेला लाल मातीचा थर हा जमिनीवर खाली कोसळला आहे. माथेरानचा निसर्ग बहरून गेला आहे.याच दरम्यान माथेरान येथे सहलीचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक मात्र खूपच आनंदी पाहण्यास मिळाले.अचानक अवकाळी पावसाच्या हजेरीने वृक्षांची पान फुलं बहरली असून थंड हवेसह धूळ विरहित रस्ते स्वच्छ व सुंदर दिसत असून माथेरान येथे मनाला भावणारे वातावरण आहे.
त्यात आता माथेरान मधील झाडांची पालवी देखील खुलली असून झाडांनी नवीन वेष परिधान केला आहे.त्यामुळे झाडांवरील पाने नवनवीन रंगांनी फुलून गेलेली असून त्यामुळे जंगलात अधिक वेगळे वातावरण अनुभवास मिळत आहे.त्यात माथेरान मधील जंगलात आढळणारी जंगली झाडे यांना लागणारी फुले,फळे ही वेगळी अनुभूती देत असतात.जंगलात अटक, आठुरणे,फणशी,आसाना, तोरणे, जांभूळ,करवंदे,कैरी आदी जंगली फळे यांचा हंगाम सुरू झाला आहे.हा हंगाम कमी प्रमाणात असला तरी यापैकी अनेक झाडांना लागलेली फुले ही फळामध्ये रुपांतरीत झालेली दिसून येत आहेत.त्यामुळे माथेरान मधील हौशी तरुण आणि स्थानिक आदिवासी हे जंगल भागात फिरून फळांचा शोध घेवू लागले आहेत.त्या फळांमधील अटक,आसाणा ही माथेरान आणि महाबळेश्वर शिवाय अन्य कुठेही जंगलात मिळत नाही आणि त्यामुळे पर्यटक देखील या फळांची खरेदी करण्याचा आवडीने प्रयत्न करीत असतो.
...................

गुलमोहोर ,उन्हाळी रानफुले बहरली,
माणगाव
अजित शेडगे
रस्त्याच्या दुतर्फा,रानात विविध फुलझाडे बहरली आहेत.विविध रंगांची गुलमोहोर फुलांनी बहरून आली असून निसर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.निसर्गातील बदल हे पुढील ऋतूचे भाकीत करतात.त्यामुळे रानात बहरलेल्या फुलांवरून पावसाळा जवळ आल्याचे भाकीत जेष्ठ नागरिक करत असून समाधान व्यक्त करीत आहेत.
एप्रिल मे महिन्यात उन्हाचा पारा चढत असताना रानावनात मात्र उन्हाळी रानफुलांचा बहर आला आहे. चैत्र महिन्या नंतर रानावनात झाडांना पालवी फुटली असून या पालवीतच बहावा,निवडुंग ,गुलमोहर इत्यादी वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुलांचा बहर आला आहे. रानावनात झाडांना पालवी बरोबरच आलेला हा बहर निसर्गप्रेमी ,पर्यटक यांच्या आकर्षणाचा विषय होत असून निसर्गातील उन्हाळ्याच्या काहिलीत बहरणारी रानफुले निसर्गाची शोभा वाढवित आहेत.
उन्हाळा हा काहीसा उदासवाना ऋतू असतो.झाडांची पानगळ,उन्हाची वाढणारी काहीली व भकास वाटणारे रान असे काहीसे चित्र सर्वत्र दिसते.मात्र याच ऋतूत रानातील अनेक फळ झाडे ,फुल झाडे फुलून येतात यामुळें उन्हाळ्याच्या दिवसात रानाची शोभा वाढत असून रानावनात झाडांना उन्हाळी रान फुलांचा बहर आलेला दिसत आहे.
कोकणातील सह्याद्री पर्वताची कडे कपारीत ,रस्त्यांच्या
दुतर्फा ,शेत शिवारात असंख्य प्रकारच्या फळ ,फुल झाडांना पालवी बरोबरच फुलांचे गुच्छ आले आहेत.एरवी उन्हाळा रुक्ष उदास वाटतो मात्र रानावनात फुलणाऱ्या उन्हाळी रान फुलांनी निसर्ग उन्हाळ्यातही आपली शोभा कायम ठेऊन सुंदरता कायम ठेवत असल्याचे निसर्गप्रेमी ,पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत.
*रानातील फुलांना बहर आला की पावसाळा जवळ आल्याचे समजले जाते. पावसाळ्यापूर्वी ही फुलझाडे फुलतात त्यामुळे पावसाचे संकेत मिळतात.
दगडू कालप,जेष्ठ नागरिक.
*रस्त्याच्या दुतर्फा, रानावनात असंख्य प्रकारच्या झाडा, वेलीना फुलांचा बहर आला आहे.हा बहर रानावणाची शोभा वाढवत आहे.रानात बहरलेली ही फुले पाहणे अतिशय आनंदाचे आहे .ही फुले ऐन उन्हाळ्यात फुलतात या नंतर काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल.पावसाळा जवळ आल्याचे उन्हाळी रान फुले संकेत देतात.
विलास देगावकर,फुल निरीक्षक,माणगाव.
फोटो - उन्हाळ्यात फुललेली फुले.

-----------------------

Remarks :

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com