पर्यटकांची हवा...
माथेरानचा गारवा...

पर्यटकांची हवा... माथेरानचा गारवा...

अजय कदम, माथेरान
मुंबईपासून जवळ थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांची माथेरानकडे पावले वळू लागली आहेत. वातावरणातील बदल, अवकाळी पावसामुळे वातावरणात उष्‍मा वाढला आहे. मात्र जंगलाने वेढलेले, हिरव्यागार वृक्षवेलींनी व्यापलेल्‍या माथेरानमध्ये आजही गारवा जाणवत असल्‍याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
माथेरान हे ब्रिटिशांनी शोधून काढलेले थंड हवेचे ठिकाण असून राज्य सरकारच्या माध्यमातून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे. त्यामुळे दहा वर्षांत माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. माथेरानमध्ये पर्यटनाचे तीन हंगाम असतात, त्यात पावसाळी पर्यटन मागील पाच वर्षांत बहरू लागले आहे, पण सर्वाधिक पर्यटक उन्हाळ्यात येतात. त्यामुळे एप्रिलअखेर ते जून पहिल्या आठवड्यापर्यंत माथेरान हाऊसफुल असते. याचे कारण म्हणजे माथेरानमधील वनराई. येथील वातावरण थंड असल्याने उन्हाळ्यात माथेरानमधील पर्यटन बहरते. या वर्षी माथेरान हे आणखी बहरण्याची शक्यता आहे. गारपीट आणि प्रचंड उष्म्यामुळे राज्यात सर्वत्र वातावरणातील पारा वर चढत आहे. गारपिटीमुळे राज्यातील सर्व भागात अवकाळी पाऊस झाला आहे, परिणामी तापमान चाळिशी पार गेले आहे. परंतु माथेरानमध्ये महिनाभर वातावरणात नेहमीपेक्षा अधिक गारवा जाणवला. ज्या वेळी अन्य ठिकाणी उन्हाळा वगळता इतर वेळी ३२ अंश सेल्सिअस वर असते तसे सध्याचे माथेरानमधील वातावरण ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे असते. माथेरानमधील लाल माती आणि माथेरानचे ५४ चौरस किलोमीटरचे जंगलामध्ये जागोजागी असलेली झाडे यामुळे येथे कायम थंडगार वातावरण असते. या वर्षी माथेरानचे तापमान अजूनपर्यंत ३६ अंशाच्या पुढे गेले नसल्‍याचे येथील तापमान मापक यंत्रणेच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

तापमानाची माहिती थेट मुंबईला
माथेरानमधील पर्जन्यमापक आणि तापमानमापक यंत्रणा हे थेट मुंबई केंद्राशी संबंधित असून या सर्व तापमानाची माहिती सर्वात आधी मुंबई येथील हवामान यंत्रणेकडे पाठवली जाते. मुंबई येथील हवामान यंत्रणाही माथेरानमधील थंडगार हवामानामुळे चर्चेत आहे. अवकाळीमुळे राज्‍यात उष्‍मा वाढला असला तरी माथेरानमध्ये मात्र गारवा कायम आहे. त्‍यामुळे यंदाचा उन्हाळा पर्यटकांना माथेरानमध्ये विशेष आकर्षण करणारा ठरणार आहे. सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे शनिवारपासून पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाले आहेत. त्‍यामुळे मिनी ट्रेन आणि माथेरानमधील ३८ प्रेक्षणीय पॉइंट पर्यटकांनी गजबजून जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com