गिरीशिखरावर वरूणराजा प्रसन्न
गिरीशिखरावर वरुणराजा प्रसन्न
माथेरानमध्ये चार महिन्यांत ५,९५० मिलिमीटर नोंद
माथेरान, ता. १ (बातमीदार) ः चार महिन्यांत तब्बल ५,९५० मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस माथेरानमध्ये बरसला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही कुठेही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. त्यामुळे गिरीशिखरावर वसलेले टुमदार शहर असलेली पर्यटननगरी सुखावली आहे. माथेरानमध्ये मेपासून पावसाला सुरुवात झाली होती. पर्यटन हंगामातच पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाळ्यात वातावरणात गारवा जाणवत होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून नैर्ऋत्य मोसमी पाऊस सुरू झाला. जुलैमध्ये पावसाचा वेग थोडा वाढलेला दिसला, तर ऑगस्टमध्ये कधी अतिमुसळधार तर कधी अतिवृष्टी झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत समाधानकारक पावसाचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे, दरवर्षी पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. २० ऑगस्टला २४ तासांत तब्बल ४३८.४ इतका प्रचंड पाऊस बरसला होता; पण असे असताना किरकोळ घटना वगळता कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही.
-------------------
सूर्यदर्शन दुर्लभच
श्रावण महिना, गोकुळाष्टमी, गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवसुद्धा पावसाच्या सावटातच गेली. ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र धुके दिसत आहे. आता ऑक्टोबर उलटूनसुद्धा माथेरानकरांना सूर्याचे दर्शन दुर्लभच आहे.
----------------------------------------------
पावसाची आकडेवारी
वर्ष मिलिमीटर
२०२२ ५५६६.४०
२०२३ ५६२३.२
२०२४ ५९२७
२०२५ ५९५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.