उत्तम पुरोहित यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तम पुरोहित यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
उत्तम पुरोहित यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

उत्तम पुरोहित यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

sakal_logo
By

मुरबाड, ता. १ (बातमीदार) : मुरबाड शहरातील विद्यार्थीप्रिय शिक्षक उत्तम पुरोहित ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, मुरबाड येथे आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड तालुका शिक्षण संस्थेचे सचिव के. जी. चौधरी, मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, आरपीआय ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र चंदने, भाजप मुरबाड शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे, नगरसेवक संतोष चौधरी, माजी पर्यवेक्षक गणेश जोशी उपस्थित होते. मुरबाडमधील मारवाडी समाजातील असूनही पुरोहित यांचे सर्व समाजांतील व्‍यक्‍तींशी चांगले संबंध असल्याने त्यांच्या चाहत्यांची समारंभास मोठी उपस्थिती होती. न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राकेश पाडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.