Sun, Feb 5, 2023

रिंक फुटबॉलमध्ये ‘स्पोर्रको - सीएफसीआयचे यश
रिंक फुटबॉलमध्ये ‘स्पोर्रको - सीएफसीआयचे यश
Published on : 1 January 2023, 9:51 am
विरार, ता. १ (बातमीदार) : वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवात यंदा प्रथमच रिंक फुटबॉल टुर्नामेंटचे आयोजन केले होते. यात १२ वर्षांखालील विभागात एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी विरार येथील ‘टीम स्पोर्रको - सीएफसीएलने’ विजेतेपद पटकावले. विजेत्या संघात ओम विश्वकर्मा, प्रथम कानचडकर, ओम यंदे, रेयांश चौधरी, ग्रेसन ग्रासियास आणि राल्फ डिसुझा हे स्पर्धक सहभागी झाले होते. प्रशिक्षक गौरव राठोड यांनी स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली. कला-क्रीडा महोत्सवाने यंदा प्रथमच फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केल्याने स्पर्धकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.