पालघरमध्ये क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर
पालघरमध्ये क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर

पालघरमध्ये क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर

sakal_logo
By

पालघर, ता. १ (बातमीदार) : जिल्हा परिषद पालघर, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण अदाणी थर्मल पावर येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक अतुल पारसकर, कार्यकारी अभियंता जे. पी. निवडुंगे, युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे उपस्थित होते. या प्रशिक्षणास सर्व गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, गट समन्वयक, समूह समन्वयक, ग्रामसेवक आदी सहभागी होते. या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी केले.