एमआयडीसीत डेब्रिजचे डोंगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीत डेब्रिजचे डोंगर
एमआयडीसीत डेब्रिजचे डोंगर

एमआयडीसीत डेब्रिजचे डोंगर

sakal_logo
By

वाशी, ता. १ (बातमीदार) ः एमआयडीसी परिसरात डेब्रिजमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. डेब्रिजचे शेकडो डम्पर राजरोसपणे एमआयडीसीच्या भूखंडावर खाली होत आहेत. त्यामुळे ऐरोली नॉलेज पार्क, रबाळे, महापे येथील मोकळ्या भूखंडावर डेब्रिज डोंगर तयार झाले असून पालिकेच्या पथकाचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेब्रिजचे बेकायदा डम्पिंग ग्राऊंड तयार होऊ लागले आहेत. अडवली-भुतिवलीमध्ये हजारो डम्परमधून डेब्रिजचा भराव करण्यात आला होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर तेथील अतिक्रमण काही प्रमाणात थांबले आहे. त्यामुळे डेब्रिजमाफियांनी इतर परिसरात नवीन डम्पिंग ग्राऊंड तयार केले आहेत. इंदिरानगरमधील शांताबाई जामा सुतार उद्यान व हिरादेवी मंदिर परिसरामधील नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडासह पार्किंगच्या राखीव जागा, एमआयडीसीच्या जलवाहिनींसह मुख्य रस्त्यालगत शेकडो डम्पर दररोज डेब्रिज टाकत आहेत. विशेष म्हणजे महापालिका व एमआयडीसी प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने भविष्यात त्याचे गंभीर परिणाम नवी मुंबईकरांना सहन करावे लागणार आहेत.
------------------------
मुंबई-ठाण्यातील कचरा नवी मुंबईत
राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डेब्रिज एमआयडीसी परिसरात टाकले जात आहे. या डेब्रिजमुळे डासांचा प्रार्दुभाव वाढल्याने रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे. डेब्रिज टाकल्याने सुस्थितीतील भूखंडाची अवस्था दयनीय होत आहे. नवी मुंबई परिसर डेब्रिजचे डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. ठाणे व मुंबईतील बांधकामाचा कचरा एमआयडीसीमध्ये टाकला जात आहे. याविषयी नागरिक तक्रारी करत असतानाही भरारी पथक बघ्याची भूमिका घेत आहे.
-----------------------------
एमआयडीसीच्या भूखडांवर डेब्रिज टाकण्यात येत असले, तरी महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाने कारवाई करायची आहे.
- आर. जी. राठोड, कार्यकारी अंभियता, एमआयडीसी