नववर्षाच्या सुरुवातीला निवासी डॉक्टरांचा संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नववर्षाच्या सुरुवातीला 
निवासी डॉक्टरांचा संप
नववर्षाच्या सुरुवातीला निवासी डॉक्टरांचा संप

नववर्षाच्या सुरुवातीला निवासी डॉक्टरांचा संप

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि पालिका रुग्णालयातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी उद्या (ता. २) काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनादरम्यान केवळ आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतली आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ज्येष्ठ निवासी डॉक्टरांसाठी पदे निर्माण करणे, सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता, नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची आठ महिन्यांपासूनची कोविड सेवा थकबाकी, कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी योग्य निवास सुविधा यासह इतर प्रमुख प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या मागण्यांबाबत निर्णय होत नसल्याने निवासी डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कनिष्ठ निवासी डॉक्टर हे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारे आहेत; तर वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणजे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आणि सरकारी रुग्णालयांमध्ये एक वर्षाच्या करारानुसार सेवा देणारे आहेत. आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याने आम्हाला संप करावा लागत आहे. आपत्कालीन सेवेशिवाय कोणतीही सेवा देणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ढगे यांनी सांगितले.
---
ओपीडीसाठी प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ बंधपत्रित निवासी डॉक्टर्स उद्या कार्यरत असतील. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- डॉ. प्रवीण ढगे, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स