Sun, Feb 5, 2023

एनसीसीतर्फे दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम
एनसीसीतर्फे दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम
Published on : 1 January 2023, 11:10 am
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः घाटकोपरच्या श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्यावतीने ‘पुनीत सागर’ अभियानांतर्गत दादर चौपाटी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत एनसीसीचे २० कॅडेट्स सहभागी झाले होते. सर्व नियांमाचे पालन करत महाविद्यालयाच्या एनसीसीच्या अधिकारी कॅप्टन ज्योती माडये यांच्या देखरेखीखाली ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या वेळी ४० ते ५० किलो कचरा गोळा करून खतनिर्मितीसाठी सदर कचरा पालिकेकडे जमा केला. ही मोहीम एमसीजीएम, घन कचरा व्यवस्थापन विजय कांबळे, कनिष्ठ आवेक्षक सुनील चितावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.