दंडात्मक कारवाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दंडात्मक कारवाया
दंडात्मक कारवाया

दंडात्मक कारवाया

sakal_logo
By

बेफिकीर चालकांविरोधात
मानखुर्दमध्ये कारवाई
मानखुर्द, ता. १ (बातमीदार) ः नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शीव-पनवेल महामार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर सुसाट दुचाकीस्वार वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसत होते. मानखुर्द वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही दुचाकीस्वार प्रवेशबंदीचे सर्रास उल्लंघन करताना दिसत होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात मानखुर्द वाहतूक विभागाने शनिवारी (ता. ३१) १०१४ आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळपासून १६६ दंडात्मक कारवाया केल्या.
सिग्नल ओलांडल्याच्या ५८, विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे ५८, दुचाकीवर तिघे प्रवासी ५, मद्यधुंद अवस्थेतील चालक ५, प्रवेशबंदीचे उल्लंघन ११८, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे ७ व इतर अशा एकूण १०१४ कारवाया पोलिसांतर्फे करण्यात आल्या. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशाच स्वरूपाच्या ११६ कारवाया वाहतूक विभागाने केल्या आहेत.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत आम्ही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही बंदोबस्त होता. सर्व अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत, असे मानखुर्द वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक बळीराम धस यांनी सांगितले.