Sun, Feb 5, 2023

वनविभागाच्या कारवाईत ११७ घोरपडीचे कातडे हस्तगत
वनविभागाच्या कारवाईत ११७ घोरपडीचे कातडे हस्तगत
Published on : 1 January 2023, 3:02 am
ठाणे (वार्ताहर) : घोरपडीच्या कातड्यापासून ढोल बनवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. वनसंरक्षक संतोष सस्ते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत ११७ घोरपडीच्या कातड्यांनी बनवलेल्या ढोलक्या वन विभागाच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत. ठाणे वन विभागाच्या पथकाने मुंबई शहरातील वनपरिमंडळ अंधेरी मौजे मालाड, सोमवार बाजार, कुंभारवाडा येथे छापेमारी केली. त्याठिकाणी भगवान सुदाम मांडळकार (वय ७२) यांच्या घराच्या परिसरात ढोलकी वाद्य बनवण्याकरिता मातीच्या मडक्यांना घोरपडीचे कातडे लावण्यात आल्याचे समोर आले. वन विभागाच्या पथकाने मडक्यांना लावलेली कातडी आणि सुटी कातडे असे घोरपडीची एकूण ११७ कातडी हस्तगत करण्यात आली.