Sun, Jan 29, 2023

म्हात्रे कुटुंबीयांकडून पाणपोईची सोय
म्हात्रे कुटुंबीयांकडून पाणपोईची सोय
Published on : 1 January 2023, 4:08 am
विरार, ता. १ (बातमीदार) : अण्णासाहेब वर्तक प्राथमिक विभागाच्या शिक्षिका प्रीती म्हात्रे यांनी त्यांचा मुलगा धवल म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्राथमिक विभागाला पाणपोई उपलब्ध करून दिली. त्याचा अनावरण सोहळा आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक यांच्या हस्ते पार पडला. कै. धवल म्हात्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रीती म्हात्रे यांच्यातर्फे प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.