काही तासांतच चोराला बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काही तासांतच चोराला बेड्या
काही तासांतच चोराला बेड्या

काही तासांतच चोराला बेड्या

sakal_logo
By

ठाणे, ता. २ : कल्याण, कोळसेवाडी परिसरात भरदिवसा दुकानात चोरी केलेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांतच बेड्या घातल्या. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात त्याने धुमाकूळ घातला होता. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. कल्याण, कोळसेवाडी, नांदिवली परिसरात शनिवारी (ता. ३१) दुपारी २ च्या सुमारास राजेश प्रजापती याच्या इलेक्ट्रिक दुकानात भरदिवसा एका चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली. ही चोरी दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याने याबाबत दुकान मालकाने कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला व अवघ्या काही तासांतच गुलछडी पोलिस ठाण्याच्या एपीआय बोचरे व दिनकर पगारे त्यांच्या पथकाने या आरोपीला कल्याण कोळसेवाडी परिसरातून बेड्या ठोकल्या. हा आरोपी भरदिवसा परिसरातील मोठ्या दुकानांत ग्राहक बनून जात असे. विक्रेत्याची नजर चुकवून दुकानातील किमती वस्तू तसेच पैसे लंपास करत असे.