केळवे येथील आदर्श विद्या मंदिरात वार्षिकोउत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळवे येथील आदर्श विद्या मंदिरात वार्षिकोउत्सव
केळवे येथील आदर्श विद्या मंदिरात वार्षिकोउत्सव

केळवे येथील आदर्श विद्या मंदिरात वार्षिकोउत्सव

sakal_logo
By

पालघर, ता. २ (बातमीदार) : केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाच्या आदर्श विद्या मंदिर या माध्यमिक शाळेच्या वार्षिक उत्सवाचे उद्‌घाटन सुमिटो कंपनीचे उपाध्यक्ष प्रकाश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही त्यांनी केलेले विज्ञानाचे प्रयोग, हस्तकलेच्या वस्तू, रांगोळ्या या सर्वांतून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता दिसून येते. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले. केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाच्या आदर्श विद्या मंदिर माध्यमिक शाळा, अ. अ. ज. चौधरी प्राथमिक विद्यालय व बालवाडी विभाग या शाळांचा वार्षिक उत्सव आयोजित करण्यात आला होता. या वार्षिक उत्सवात विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग, हस्तकलेच्या वस्तू, रांगोळ्या आदींचे प्रदर्शन भरवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी मिलिंद देव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका नूतन राऊत यांनी केले संस्थेचे अध्यक्ष विविध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य ममता किनी, वसई महानगरपालिकेच्या माजी बालकल्याण सभापती माया चौधरी यांच्यासह संस्थेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, पालक, नागरिक उपस्थित होते.