बेपत्ता मुलाचा २४ तासात शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेपत्ता मुलाचा २४ तासात शोध
बेपत्ता मुलाचा २४ तासात शोध

बेपत्ता मुलाचा २४ तासात शोध

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : कामोठे भागातून बेपत्ता झालेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोध लावला आहे. तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन कामोठे पोलिसांनी या मुलाची मुंबईतील आझाद मैदान परिसरातून शोधून पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.
कामोठे सेक्टर-३६ भागात राहणारा या घटनेतील १५ वर्षीय मुलगा हा २९ डिसेंबर रोजी खासगी क्लासला गेला होता; मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्याने अखेर त्याच्या पालकांनी कामोठे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या घटनेची वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी गंभीर दखल घेत तात्काळ पथक नेमले होते. या वेळी बेपत्ता झालेल्या मुलाजवळ मोबाईल नसल्याने तसेच मुंबईमध्ये त्याचे इतर कोणीही नातेवाईक नसल्याने त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे पोलिसांना कामोठे परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली होती. या वेळी हा मुलगा मानसरोवर रेल्वे स्टेशनवरून सीएसटीएम लोकलने गेल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी मानसरोवर ते सीएसटीएम रेल्वे स्टेशनदरम्यानच्या सर्व रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता हरवलेला मुलगा आझाद मैदानाच्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कामोठे पोलिसांनी आझाद मैदान परिसरात या मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले आहे.