भाजी मंडईला समस्यांचा घेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजी मंडईला समस्यांचा घेरा
भाजी मंडईला समस्यांचा घेरा

भाजी मंडईला समस्यांचा घेरा

sakal_logo
By

घणसोली, ता. २ (बातमीदार)ः कोपरखैरणे सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक ४० वर असलेल्या मंडईची सध्या दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी प्रवेशद्वारावरच गाड्या पार्किंग केल्या जात असून बंद अवस्थेतील पंख्यांमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची गैरसोय होत आहे.
कोपरखैरणे रेल्वे स्थानकानजीकच असलेल्या मंडईला विविध समस्यांनी घेरले आहे. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या मंडईत नेहमीच मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात; मात्र मंडईच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात वाहनांचे बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्याचबरोबर मंडईच्या बाहेर बेकायदा फेरीवाले बसत असून मंडईत असलेली पाणपोईदेखील बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मंडईतील व्यापाऱ्यांसह ग्राहकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच या मंडईत काही ठिकाणीच पंखे असल्याने व्यापारी आणि ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने ग्राहक आणि व्यापाऱ्यांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.
--------------------------
कोपरखैरणे भाजी मंडईत पंख्यांची तसेच पाण्याची सुविधा नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- रेश्मा गवळी, ग्राहक
------------------------------
कोपरखैरणेतील पालिकेच्या मंडईच्या बाहेरच फेरीवाले बसत असल्याने त्याचा भुर्दंड व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
- सुनंदा शिंगन, व्यापारी
़़़़़़ः-------------------------------
कोपरखैरणे भूखंड ४० वर असलेल्या मंडईत पंख्यांच्या सुविधेबाबत पाहणी करण्यात येईल.
- तानाजी शिंदे, विद्युत अभियंता, मनपा