
सिद्धगड येथे हुतात्म्यांना अभिवादन
मुरबाड, ता. २ (बातमीदार) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणारे हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त सिद्धगड येथे सोमवारी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्ज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली. हीच वेळ साधत सिने दिग्दर्शक एकनाथ देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचा प्रसंग नाट्य रूपात सादर केला. त्या वेळी सर्वांच्याच अंगावर शहारे आले.
या कार्यक्रमासाठी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार गोटिराम पवार, दिगंबर विशे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सदस्य उल्हास बांगर, रेखा कांटे, मुरबाड पंचायत समिती सभापती स्वरा चौधरी, उल्हासनगर महापालिकेचे उपमहापौर भगवान भालेराव, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. बलिदानभूमीत ठाणे, रायगड व पुणे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी व देशप्रेमी नागरिक दाखल झाले होते. रात्रभर सुरू असलेल्या वक्तृत्व व समूहगीत स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली.
--------------------------------
मुरबाड : तालुक्यातील सिद्धगड येथे असलेली हुतात्मा समाधी.