Tue, Feb 7, 2023

विक्रमगड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात
विक्रमगड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात
Published on : 2 January 2023, 12:58 pm
विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : विक्रमगड नगरपंचायत हद्दीतील भावर पाडा येथे विक्रमगड प्रीमियर लीगतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ३३ हजार ३३३ रुपये व चषक ए. जे. फायटर या संघाने पटकावले. द्वितीय पारितोषिक २२ हजार २२२ रुपये व चषक साई सारथी इलेव्हन या संघाने पटकावले. तृतीय पारितोषिक १५ हजार ५५५ रुपये व चषक सँडी या संघाने पटकावले; तर चतुर्थ पारितोषिक ११ हजार १११ व चषक जिजाऊ फायटर या संघाने पटकावले. स्पर्धेचे आयोजन विक्रमगड नगरपंचायतीचे नगरसेवक निकेत पडवळे यांनी केले होते. या प्रसंगी जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.